चाळीसगाव प्रतिनिधी । महानगरी एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा मिळाला असून आज पहिल्या दिवशी या एक्सप्रेसचे स्थानकावर जल्लोषात स्वागत करण्यात आले.
खासदार ए.टी. नाना पाटील यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकावर सचखंड आणि महानगरी एक्सप्रेसला थांबे मिळाले आहेत. यातील महानगरी एक्सप्रेस आज सकाळी पहिल्यांदा चाळीसगाव स्थानकावर थांबली. याप्रसंगी खासदार पाटील व आमदार उन्मेष पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.