मुंबई : वृत्तसंस्था । महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळयाला अभिवादन करून मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकर्यांना पाठिंबा देताना हाताला काळ्या फिती बांधत केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात निषेध नोंदवला.
मुंबई राष्ट्रवादी विभागीय अध्यक्ष आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली आज महात्मा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या पुतळयाला अभिवादन करण्यात आले आणि तिथेच हाताला काळ्या फिती बांधत केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा निषेध आणि शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, उपाध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, जिल्हाध्यक्ष विजय वाडकर, जिल्हा निरीक्षक महेंद्र पानसरे, तालुकाध्यक्ष मनोज आंब्रे आदींसह पक्षाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.