जळगाव प्रतिनिधी ।शहरात रविवारी ६ डिसेंबर रोजी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आ.राजूमामा भोळे आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याशी तसेच वॉटरग्रेसच्या प्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजन यांचा संबंध नसल्याचा खुलासा द्यावा लागला. मात्र गिरीश महाजन यांचे नाव तपास यंत्रणेने अथवा अधिकृतपणे घोटाळ्यात असल्याचे जाहीर झालेले नसतानादेखील गिरीश महाजन यांचा बचाव भाजपचे जिल्हाध्यक्षांना का करावा लागत आहे ? असा महत्त्वाचा सवाल शिवसेनेचे स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांनी विचारला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात वाटर ग्रेस प्रकरण आणि बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी गिरीश महाजन यांचा कुठलाही संबंध नसल्याची माहिती त्यांनी दिली होती. मात्र याबाबत आर्थिक गुन्हे शाखेचा तपास सुरू आहे. त्या तपासात अद्यापही गिरीश महाजन यांचे नाव समोर आलेले नाहीत किंवा अधिकृत यंत्रणेने त्यांचा हात असल्याचे देखील जाहीर केलेले नाही असे असताना सुद्धा भाजपच्या जिल्हाध्यक्षांना गिरीश महाजन यांचा खुलासा करून बचाव करावा लागणे याचा अर्थ नागरिकांनी काय धरावा असेही प्रशांत नाईक यांनी म्हटले आहे.
तसेच सागर पार्कप्रकरणी महाविकास आघाडीने शंभर कोटी रुपयांची सुपारी घेतली असा गंभीर आरोप केला आहे, त्यासाठी आयुक्तांच्या दालनात रोज एक महिला वकील भेटुन जाते असे म्हटले आहे. मग त्या महिला वकिलाचे नाव का जाहीर करीत नाही ? जे काही आहे ते पुराव्यानिशी आणि पूर्ण नावे घेऊन आमदारांनी बोलावे, लपवाछपवीचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल करू नये असे खुले आव्हान प्रशांत नाईक यांनी दिले आहेत