Home अर्थ महागाई विरोधात पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन   

महागाई विरोधात पाचोऱ्यात काँग्रेसचे आंदोलन   

0
34

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करीत पाचोरा काँग्रेस कमिटीच्या वतीने पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले.

देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर कॉंग्रेसच्या देशव्यापी आंदोलन केले जात आहेत. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध घोषणाबाजी करीत आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी देशात हुकूमशाही सुरु झाली आहे. बेरोजगारी महागाईच्या प्रश्नावर बोलणाऱ्यांना ईडीची भिती दाखवून त्यांना गप्प केले जात असल्याचा आरोप केला.

केंद्र सरकारने आणलेली अग्निपथ योजना, ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत द्यावी, गॅस, दरवाढ आदी घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालयात पर्यंतचा परीसर दणदणला होता. काँग्रेसच्या वतीने आंदोलन रुपी निषेध व्यक्त करून तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी ईडीच्या नावाखाली विरोधी पक्षनेत्यांना त्रास देण्याचे काम सुरू असून खा. मल्लिका अर्जुन खरगे यांना नोटीस दिली. या घटनेचा निषेध करण्यात आला.

यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहर अध्यक्ष अॅड अमजद पठाण, शेख इस्माईल शेख फकिरा, प्रताप पाटील, इरफान मणियार, प्रदीप चौधरी, शंकर सोनवणे, रामदास गायकवाड, अल्ताफ शेख, कल्पेश येवले, रविंद्र भावसार, शरीफ शेख, नवाब खाटीक, संगीता नेवे, कुसुम पाटील, कल्पना निंबाळकर, अमजद खान, सै. इकबाल सै. मेहबुब, भाऊसाहेब कुंभार, आर. जी. अहिरे, नुरकलाल बागवान, बिस्मिल्ला टकारी सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound