जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील बसस्थानकात आलेल्या तरूणाचा महागडा मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून दोन चोरट्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राहूल दिपककुमार चांदवाणी (वय-२५) रा. सिंधी कॉलनी, जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. कापड विक्रीचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. गुरूवार २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता राहूल चांदवाणी हे कापडाचा विक्री करण्यासाठी लागणारा माल घेण्यासाठी जामनेर बसस्थानकाजवळ आले होते. त्यावेळी अंकूश मधुकर सुरवाडे (वय-२४) रा. शिवाजी नगर, जळगाव आणि गौरव जगन कोळी (वय-२२) रा. कोळन्हावी ता. यावल या दोघांनी राहूल यांच्या जवळील मोबाईल आणि रोकड असा एकुण २६ हजार २९० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अंकूश मधुकर सुरवाडे (वय-२४) रा. शिवाजी नगर, जळगाव आणि गौरव जगन कोळी (वय-२२) रा. कोळन्हावी ता. यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ रविंद्र बिऱ्हाडे करीत आहे.