मविआ सरकार पाडण्यासाठी दोन भाजप नेत्यांचा होता दबाव : संजय राऊत

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील महाविकास सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार बनविण्यासाठी दोन भाजप नेत्यांचा आपल्यावर प्रचंड दबाव असून याबाबत आपण आधीच उपराष्ट्रपतींना पत्र लिहून माहिती दिली होती असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे. ईडी कार्यालयात जाण्याआधी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी भाजपवर आरोप केला.

 

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांना अटक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राऊत यांनी सकाळपासून विविध ट्विट करून आपण झुकणार नसल्याचे सांगितले आहे. सायंकाळी त्यांना ईडीचे पथक मुंबईतील कार्यालयाकडे घेऊन जात असतांना संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना भाजपवर टीका केली.

 

याप्रसंगी संजय राऊत म्हणाले की, आम्ही कुणासमोर झुकणार नाही. माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसून मला या प्रकरणात मुद्दाम फसविण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून आपल्यावर भाजपचे दोन नेते दबाव टाकत होते. शिवसेनेने मविआ सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सरकार स्थापन करावे यासाठी धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र या धमक्यांना आपण भीक घातली नसून शेवटच्या क्षणापर्यंत आपण शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले.

Protected Content