पुणे (वृत्तसंस्था) मला कुणाशीही काही बोलायचे नाहीय. मला माझे काम करायचे आहे, अशा शब्दात बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना जाहीर फटकारल्यानंतर अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच यावर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. तसेच मला कुणाशीही काही बोलायचे नाही. मला माझे काम करायचे आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणले, असे म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचे टाळले. अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत.