यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार सुनिल दशरथ गावडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचे या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
तालुका खरेदी विक्री संघाच्या सभागृहात मराठा सेवा संघाची बैठक प्रा मुकेश पोपटराव येवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत मराठा सेवा संघाची तालुका अध्यक्ष अजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुतन तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली असून, यात मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्धी प्रमुखपदी पत्रकार सुनिल दशरथ गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
बैठकीस मराठा सेवा संघाचे नुतन तालुका अध्यक्षपदी सावखेडा सिम येथील अजय आत्माराम पाटील, तालुका सचिव अतुल यादव , उपाध्यक्षपदी धनराज पाटील , के. यु . पाटील , बी डी पाटील , तालुका संघटक मनिष विजयकुमार पाटील, तालुका कार्याध्यक्ष डी. बी. पाटील , सहसचिवपदी महेश पाटील यांच्यासह समाजातील प्रमुख या बैठकीस प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी उपस्थित समाज बांधवांनी मराठा सेवा संघाच्या तालुका प्रसिद्ध प्रमुखपदी यावल येथील पत्रकार सुनिल दशरथ गावडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी प्रा. मुकेश येवले , अजय पाटील , के यु पाटील , डी बी पाटील यांनी उपस्थित समाज बांधवांचे मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन प्रा. मुकेश येवले यांनी तर आभार के. यु. पाटील यांनी मानले.