नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी १५ जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार असल्याचे न्यायालयाने आज सांगितले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोणत्याही प्रकारे निकाल देऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले.
मराठा आरक्षण प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी रोज सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शविली असून, त्यासाठी लेखी दावे-प्रतिदावे आणि त्यासाठी लागणारा वेळ ठरवून घेण्यास दोन्ही बाजूच्या पक्षकारांना सांगण्यात आले आहे. याशिवाय मराठा आरक्षण आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या संदर्भात अंतरिम आदेश देण्यासाठी १५ जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे. या काळात तात्काळ तारखेचा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. अंतरिम आदेशांवर विचार करण्यासाठी आम्ही या सर्व याचिकांची यादी करू,’ असे न्यायमूर्ती राव म्हणाले यांनी म्हटले आहे. त्यामुळे 15 जुलैला कोर्ट काय निर्णय देते, हे पाहावे लागेल.