सावदा ता.रावेर प्रतिनिधी । मराठा आरक्षणावरील न्यायालयीन स्थगिती तत्काळ उठविण्याची मागणी सकल मराठा समाज रावेर तालुकाच्या वतीने आमदार शिरीष चौधरी यांना खिरोदा येथे जावून निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरीम स्थगिती उठवावी. चालु आर्थीक वर्षांपासून समाजाच्या विद्यार्थ्यांना फी परतावा राज्य सरकारकडून मिळावा. राज्यात होणाऱ्या भरती तत्काळ थांबवाव्यात. आण्णसाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला १ हजार कोटींची तरतूद करावी, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्ती तसेच आत्महत्या शेतकऱ्यांच्या कुटूंबाचे पुर्नवसन करावे, मराठा समाजावरील आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे, मराठा आरक्षण आंदोलनात बलीदार दिलेल्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी. अरबी समुद्रातील शिवस्मारक त्वरीत उभे करावे, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सरसकट द्यावी, कोपर्डी प्रकरणातील दोषींना शिक्षेची अंमलबजावणी करावी, गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी ५०० कोटींची तरतूद करावी. वरील सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा गमिनी कावा पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा रावेर तालुका मराठा समाजाच्यावतीने देण्यात आले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/777851962785786/