मुंबई प्रतिनिधी / मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांचा पाठपुरावा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळ समितीने आज सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बाजू मांडणारे मुकुल रोहतगी यांची भेट घेऊन पूर्वतयारीचा आढावा घेतला.
आज झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया देताना मंत्री अशोक चव्हाण म्हणाले की मराठा आरक्षण कायदा टिकला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्या बाजूने लागला पाहिजे यासाठी राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ नेमले आहेत. यासोबत चर्चा करून या प्रकरणाच्या सुनावणी बाबत विविध पैलूंची चर्चा करण्यात आली. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह एकनाथ शिंदे व अन्य मंत्री उपस्थित होते.