मराठा आरक्षणाबाबत विरोधक गैरसमज पसरवताय : उपमुख्यमंत्री

 

मुंबई । विधीमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणावरून विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना याबाबत विरोधक गैरसमज पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

राज्यविधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. मराठा आरक्षणावरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे. याबाबत अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आधीच्या सरकारने दिले त्यापेक्षा अधिक वकील राज्य सरकारने दिले आहेत. आता त्यातही कोणाला राजकारण करायचं असेल गैरसमज पसरवायचे असतील तर, त्यांना कोणी थांबवू शकत नाही.

आरक्षणाचे प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना राज्य सरकारला कोणी प्रश्‍न विचारु शकतं का? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्‍नांवर सरकार कधीही चर्चा करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत: बाहेर येऊन चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं होतं,फ असही अजित पवारांनी म्हटलं आहे.

Protected Content