यावल, प्रतिनिधी । येथील शहरातील कालीका पेठ मधील मुळ रहीवासी मनोहर मुरलीधर सराफ ह्यांचे दि. २८ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. ते भुसावळच्या रेल्वे विभागाचे सेवा निवृत्त कर्मचारी होते. यावलचे मूळ रहिवासी व नोकरी निमित्त भुसावळला वास्तव्ययास असलेले मनोहर सराफ ह्यांचे निधन पुणे येथे एका खाजगी रुग्णालयात उपचार दरम्यान झाला. त्यांचावर पुणे येथेच अंत्संस्कार करण्यात आलेत, त्यांचा पश्यात एक मुलगा एक मुलगी सून जावई नातवंडे असा परिवार आहे. ते प्रसाद सराफ ह्यांचे वडील होत.
मनोहर सराफ यांचे निधन
3 years ago
No Comments