Home क्राईम मनुदेवी तीर्थक्षेत्राजवळची दुकाने चोरट्यांनी फोडली

मनुदेवी तीर्थक्षेत्राजवळची दुकाने चोरट्यांनी फोडली

0
48


यावल प्रतिनिधी । यावल तालुक्याच्या पश्‍चिम भागात सातपुड्यातील मनुदेवी तीर्थक्षेत्री मंगळवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी सहा दुकाने फोडून ५० हजारांचा मुद्देमाल लांबवला.

आडगाव येथून सातपुड्यात काही अंतरावर श्रीक्षेत्र मनुदेवी आहे. मनुदेवी तीर्थक्षेत्रावर भाविकांना आवश्यक अशा पूजा साहित्य तसेच विविध खेळणे आणि नाश्त्याची दुकाने आहेत. सोमवारी रात्री दुकानदार आपापली दुकाने बंद करून गावी निघून गेले होते. मंगळवारी सकाळी परतले असता त्यांच्या दुकानांत चोरी झाल्याचे आढळून आले. अज्ञात चोरट्यांनी विश्‍वदीप पाटील (नुकसान ८००० रुपये)
– गोपाल पाटील (नुकसान १७००० रुपये)
– निलेश पाटील (नुकसान १२००० रुपये)
– शशिकांत कोळी (नुकसान ७००० रुपये)
– छोटी तडवी (नुकसान २००० रुपये)
– सोनु पाटील नुकसान (७००० रुपये) याच्या दुकानातील सामान लांबवल्याचे निदर्शनात आले आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी दुकानदार रवाना झाले आहे. या घटनेमुळे तिर्थक्षेत्रावरील दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound