यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील मनवेल येथे खबरदारीचा उपाय म्हणुन आरोग्य यंत्रणा व आशा वर्कर युद्धपातळीवर नागरीकांमध्ये जनजागृती करून आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणू संसर्गाचा दिवसेंदिवस वाढणारा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर विविध उपाययोजना केल्या जात आहे. चौथ्या लोकडाऊनमध्ये मुंबई ,पुणे व इतत्र बाहेरगावाहुन आलेले नागरीक तसेच शहरातुन मुळगावी येणारांची संख्याही मनवेल व तालुक्यात मोठया प्रमाणात वाढत झालेली आहे. या सर्व प्रकाराची तपासणी करण्याकरिता ग्रामीण भागामध्ये कुठलीही शासनाकडुन अद्याप कुठलीही तपासणी यंत्रसामग्री प्राप्त झाली नसल्यामुळे आरोग्य विभाग व आरोग्य सेवक, आशा वर्कर यांना सर्वेक्षणामध्ये तपासणीसाठी खुप मोठया आडचणींना सामोरे जावे लागत होते. अशा संकटासमयी मनवेल ग्रामपंचायतच्या माध्यमातुन दोन थर्मामीटर खरेदी केली असुन गावात घरोघरी जावुन आशावर्कर रंजना कोळी, अंगणवाडी सेविका कल्पना पाटील, मदतनीस अलका इंधाटे घरोघरी जावुन कोरोनासंदर्भात जनजागृती करून नागरीकांची आरोग्य तपासणी करीत आहे.प्रथम घरोघरी सँनिटायझर वाटप करण्यात आले व आता थर्मामीटरणे शारिरीक तापमान तपासणी संपूर्ण गावामध्ये चालु करण्यात आले आहे अशी माहीती मनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी दिली आहे. या होम टु होम आरोग्य तपासणी व कोरोना आजारा संदर्भातील जनजागृती मोहीमेस नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन सरपंच नरेन्द्र जगन्नाथ पाटील व ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी केले आहे .