मनपातर्फे तिसऱ्या दिवशीही मार्केटमधील दुकान सील करण्याची कारवाई (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील मार्केटमधील दुकाने ३० जून पर्यत खुली करू नयेत असे आदेश मनपा आयुक्तांनी काढले आहेत. मात्र, काही मार्केटमध्ये गाळेधारकांनी दुकाने उघडल्याने मनपातर्फे आज सील करण्याची कारवाई करण्यात आली.

उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने मार्केटमध्ये सुरु असलेल्या दुकानांवर सील करण्याची कारवाई करण्यात आली. गोलाणी मार्केटमध्ये अतिक्रमण निर्मूलन पथक सकाळी ११ वाजता दाखल झाले. यावेळी त्यांना मार्केटमधील जवळपास ८० टक्के दुकाने बंद आढळून आली तर २० टक्के दुकाने उघडी होती. पथकास महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळील परफेक्ट पेट शॉप हे दुकान सुरु असल्याचे निदर्शनास आले असता ते सील करण्यात आले. गोलाणी मार्केटमधील ग्राउंड फ्लोअरला बी.एच.आर. मोबाईल हे दुकान सील करण्यात आले. पथकाने यासह इतर २ दुकाने गोलाणी मार्केटमध्ये सील केलीत. दरम्यान, पथक जस जसे मार्केटमध्ये पुढे पुढे जात होते तस तसे दुकानदार स्वतःहुन दुकान बंद करून पळून गेलेत. गोलाणी मार्केटमध्ये ही कारवाई दिड वाजेपर्यत चालली. यासोबतच फुले मार्केट मधील १ व गणेश कॉलोनी मधील २ दुकाने सील करण्यात आली. ही कारवाई उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण अधीक्षक एच. एम. खान , पथकातील सतीश ठाकूर,संजू पाटील,नाना कोळी,संजू परदेशी, संजू ठाकूर ,वैभव धर्माधिकारी,,किशोर सोनवणे,राजू वाघ यांनी केली.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/260639045043436/

 

Protected Content