Home Cities अमळनेर मध्यरात्री घरातून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले;

मध्यरात्री घरातून सोन्या-चांदीचे दागिने लांबविले;


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील ढेकू रोडवर असलेल्या शास्त्रीनगर परिसरातून मध्यरात्री घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २२ हजार ५०० किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार १९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 

अमळनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रमिला हरिचंद्र वाडेकर (वय-५४) रा. शास्त्रीनगर ढेकू रोड, अमळनेर या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १८ जून सायंकाळी ६ ते १९ जून सकाळी ७ वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असताना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण २२ हजार ५०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सोमवारी १९ जून रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आला. त्यानंतर महिलेने अमळनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार बापू साळुंखे करीत आहे.


Protected Content

Play sound