अमळनेर, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. या कालावधीत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, अमळनेरात मद्य दुकानांतून विक्री केली जात असल्याचे आमदारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर अमळनेर येथे तपासणी केली असता १५ दुकानदारांविरोधात मद्य साठयात तफावत आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लॉकडाऊनच्या काळात अमळनेर येथे विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे आमदार अनिल पाटील यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी शहरात तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेत एकूण २५ दुकानांची तपासणी केली असता १५ दुकानांत मद्य साठयात तफावत आढळून आल्याने त्या १५ दूकानदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.