नवी दिल्ली (वृत्तसंस्था) लॉकडाऊन संपत असताना मद्यप्रेमींसाठी खुशखबर समोर आली आहे. दोन राज्यांनी तूर्तास थोडा काळ मद्यविक्री करण्यास परवानगी दिली आहे. आसाम आणि मेघालय या दोन राज्यात सात तासांसाठी मद्यविक्री सुरु झाली आहे. विशेष म्हणजे दारुड्यांनी दुकानांबाहेर रांगा लावल्या आहेत.
आसाममध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत, तर मेघालयमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत मद्यविक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 13 एप्रिल म्हणजे आजपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झाली आहे. आसामच्या उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त एस. के. मेधी यांनी शासन आदेश जारी केला. तर मेघालय सरकारनेही तसे आदेश काढले आहेत.दरम्यान, दुकानदारांनी कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही बंधनकारक आहे.