जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊनच्या काळात दारूची दुकाने पुर्णपणे बंद होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आजपासून दारूची दुकाने उघडण्याची परवानगी जरी दिली तरी मात्र दारूच्या दुकानांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी झाल्याशिवाय दुकाने उघडता येणार नसल्याने मद्यपींना दुपारपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
दरम्यान सकाळच्या ८ वाजेपासूनच मद्यशौकिन वाईन्स हाऊस परिसरात सावलीचा विसावा घेत दुकान कधी उघडेल याप्रतिक्षेने थांबून आहेत. त्यांच्यामध्ये विविध प्रकारची आनंददायी चर्चा सुरू आहे. ‘आज मी तर इतक्या बाटल्या खरेदी करेल, मनसोक्त एन्जॉय करेल सोबतीला नॉनव्हेजही करेल’ अशी चर्चा रंगतांना दिसली. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव दिसून आले. दरम्यान आदेशानुसार वाईन्स शॉप दुकानावर काम करणारे कर्मचाऱ्यांची जिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणी झाल्याशिवाय दुकान उघडण्याची परवानगी दिली जाणार नाही. यासाठी लायसन्सधारकांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी राज्य उत्पादक शुक्ल विभागाकडे धाव घेतली आहे.