नवी दिल्ली । लवकरच मतदार कार्डाला आधार लिंक करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून केंद्र सरकारने निवडणूक सुधारणा कायद्यात याची तरतूद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
केंद्र सरकारने निवडणूक सुधारणा कायदा संमत करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याच्या अंतर्गत मतदार कार्डला आधार लिंक करण्यात येणार आहे. या संदर्भातील निवडणूक आयोगाच्या प्रस्तावास कायदा मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. यासाठी आता सरकारकडून निवडणूक आयोगास कायदेशीर अधिकार मिळणार आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार कार्डशी जोडणी केल्यानंतर बोगस मतदारांना रोखता येणार आहे. ही मागणी आयोगाकडून अनेक वर्षांपासून केली जात होती. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, निवडणूक आयुक्त अशोक लवासा व सुशील चंद्रा यांनी कायदा मंत्रालयाचे सचिव जी नारायण राजू यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या निर्णयाला हिरवा कंदील दाखविण्यात आला असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.