जळगाव : प्रतिनिधी । कामाचे पैसे मागितल्याच्या रागातून खेडी खुर्द येथील जितेश अहिरे (२१) या तरूणास आंबेडकरनगरातील तिघांनी शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना ३ एप्रिलरोजी रात्री घडली. आज शनिपेठ पोलिस ठाण्यात तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
जितेश अहिरे ट्रॅक्टर चालक आहे. त्याने त्याच्या कामाच्या पैशांबाबत ईश्वर अहिरे यास विचारणा केली. त्याचा राग आल्याने ईश्वर अहिरे यांनी शिवीगाळ केली. याचवेळी रवींद्र अहिरे याने जितेश यास शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. अक्षय शिरसाठ याने दगडाने जितेश याच्या डोक्यात मारून दुखापत केली.
जितेश जखमी झाला हाेता उपचारानंतर त्याने शनिपेठ पोलिस ठाणे गाठून तिघांविरोधात तक्रार दिली. ईश्वर अहिरे, रवींद्र अहिरे, अक्षय शिरसाट ( सर्व रा आंबेडकरनगर जळगाव ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पो हे कॉ परीस जाधव हे करीत आहेत