जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सहयोग क्रिटीकल केअर सेंटर जवळून एका मजूराची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविंद्र पांडूरंग पाटील (वय-४४) रा. गणेश नगर, सबजेलच्या मागे, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास रविंद्र पाटील हे (एमएच १९ डीजे ०२६६) क्रमांकाची दुचाकी घेवून शहरातील सहयोजन क्रिटीकल जवळील सीटी लाईट केबल गोडावून जवळ आले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी पार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्यांनी ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनिवार ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक राजकुमार चव्हाण करीत आहे.