मजुरांना मिळणार ९० दिवसात दाखले

 

पाचोरा, प्रतिनिधी । भारतीय मजदूर संघातर्फे ग्रामीण भागातील बांधकाम मजुरांची शासन निर्णयानुसार नोंदणी करून दाखले देण्यात यावेत अशी मागणी गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना निवेदनाद्वारे केली होती. यामागणीनुसार गटविकास अधिकाऱ्यांनी नव्वद दिवसात मजुरांना दाखला देण्याचे आदेश काढले आहेत.

शासनाच्या धोरणानुसार बांधकाम मजुरांना नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच त्याचे नुतनीकरण करणे गरजेचे असते. यासाठी ग्रामीण भागात बांधकाम मजुरांना ग्रामसेवकांनी दाखला देणे बंधनकारक आहे. मात्र, ग्रामीण भागात मजुरांना बांधकामाचा असल्याबाबतचा दाखला देण्यास ग्रामसेवक टाळाटाळ करीत होते. याबाबत भारतीय मजदूर संघातर्फे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन ग्रामीण भागात ग्रामसेवकांनी बांधकाम मजूर असल्याबाबत नव्वद दिवसात काम करीत आहे याची खात्री करून सही शिक्का दाखला देणे बंधनकारक असल्याचे आदेश पारित केलेत. यामुळे आता यापुढे ग्रामसेवकांना बांधकाम मजुरांना नोंदणी करण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी दाखला देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंबंधी भारतीय मजूर संघाने गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. यावेळी भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष प्रविण मिस्तरी, गजानन सुतार किशोर वाघ, सुनिल सुतार, किशोर सुतार, प्रशांत मिस्त्री सुभाष सुतार आदी कामगार हजर होते.

Protected Content