मग भाजपच्या मंत्र्यांचे फोटो का नाही छापले : अजित पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेनेने काल आणि आज दिलेल्या जाहिरातींवरून वाद संपत नसून आजच्या जाहिरातीवरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जोरदार टिका केली आहे.

 

शिंदे गटाने आज डॅमेज कंट्रोल करण्यासाठी जाहिरात दिली असून आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना यावर टिका केली. ते म्हणाले की, जाहिरातीत खाली ९ मंत्र्यांची माळ लावली आहे. मग भाजपाच्या मंत्र्यांचे फोटो का नाही टाकले? ९ जणांची माळ लावली आहे. पण त्यातल्या ५ मंत्र्यांबद्दल सातत्याने वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर, राजकीय पक्षाचे लोक किंवा मीडिया प्रश्न उपस्थित करत आहेत. ते वादग्रस्त मंत्री आहेत. या वादग्रस्त मंत्र्यांविषयी दोन दिवसांपासून माध्यमांवर सातत्याने बातम्या येत आहेत. वादग्रस्त मंत्र्यांच्या कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय का? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. या प्रश्नांची शिंदे गटाने उत्तरं दिली पाहिजेत असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

 

अजित पवार म्हणाले की, गेल्या निवडणुकीत देशात नरेंद्र तर महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा देण्यात आली होती. आता मात्र जाहिरातींच्या माध्यमातून दुसरेच काही समोर येत आहे. याबाबत सत्ताधारी पक्षांमधील अंतर्गत कलह समोर येत असल्याची टिका त्यांनी केली.

Protected Content