मुंबई प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील राज्यातील मंदिरे सुरू करण्यात यावीत यासाठी आंदोलने सुरू केली आहेत.
जन्माष्टमीच्या दिवशी भाजपने राज्यात घंटानाद व शंखनाद आंदोलन करून देवस्थाने खुली करण्याची मागणी केली होती. यानंतर मंदिरे खुली करण्यासाठी घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. या अनुषंगाने आता मनसेने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता पुण्यात आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी तांबडी जोगेश्वरी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केले आहे. याशिवाय, राज्यातील अन्य शहरांमध्येही मनसेने याच प्रकारची आंदोलने करून राज्यातील महाविकास आघाडीचा निषेध केला आहे.