Home आरोग्य मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद

मंत्रालयात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश बंद

0
35

मुंबई प्रतिनिधी । कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मंत्रालयात सर्वसामन्य नागरिकांना प्रवेश बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे वृत्त आहे.

मंत्रालयात दररोज राज्याच्या कान्याकोपर्‍यातून मोठ्या प्रमाणात स्त्री-पुरूष येत असतात. यामुळे अनेकदा गर्दी होत असते. सध्या कोरोनाच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता राज्यातील अनेक गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लादण्यात आलेले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, मंत्रालयात येणार्‍या सर्वसामान्य व्यक्तींना ३१ मार्चपर्यंत मजाव करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री, अधिकारी आणि कर्मचार्यांनाच आता मंत्रालयात जाता येणार आहे.


Protected Content

Play sound