यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यात दोन दिवसापुर्वी वाळु माफियाच्या वतीने साकळीचे मंडळाधिकारी सचिन जगताप यांच्यावर झालेल्या भ्याड प्राणघातक हल्याच्या निषेर्धात व हल्ल्यातील संशयीत आरोपीस अटक करण्याच्या मागणीसाठी यावल तालुका तलाठी संघ आणी महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने यावल तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावुन सामुहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे.
यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळु गौण खनिजची तस्करी करुन वाहतुक करण्यात येत असुन या सर्व प्रकाराकडे काही अधिकाऱ्यांचे आर्थिक सुत जुळल्याने वाळु माफिया हा यावल तालुक्यात मोठया प्रमाणावर सक्रीय झाल्याचे दिसुन येत आहे . दरम्यान निस्वार्थपणे आपले कर्तव्य बजावणारे मंडळ अधिकारी सचिन जगताप या अधिकाऱ्यावर दोन दिवसापुर्वी आपले कर्तव्य बजावत असतांना नावरे फाटया जवळ ट्रॅक्टरव्दारे अवैधरित्या वाळु वाहतुक करणाऱ्यांनी तहसीलच्या वाहनावर लाकडी दांडयाने तोडफोड करण्यात आली. मंडळ अधिकारी सचिन जगताप यांना मारहाण करीत शिवीगाळ व जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यावल तालुक्यात व यावल शहरात मोठया प्रमाणावर अवैधरित्या वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असुन या सर्व प्रकाराला वेळीच प्रतिबंध करण्याची गरज असुन, स्थानिक पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी या घटनेतील गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी करत यावल तालुका संघ व महसुल कर्मचारी संघटनेच्या वतीने यावल तहसील कार्यालयासमोर काळ्या फिती लावुन सामुहिक रजा आंदोलन सुरू केले.
आंदोलनकर्त्यांचे शिष्ठ मंडळ फैजपुर येथे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांची भेट घेवुन आपल्या मागण्याचे निवेदन सादर करणार आहे. यावेळी आंदोलनात आर. आय. कोळी, टी.सी. बारेला, समिर तडवी , एस. व्ही. सुर्यवंशी , एम. एम. तडवी , पु.यु. बाझुळकर, व्ही. आर. तडवी , एस. एल. पाटील, एस. जी. बाबर, एम. जी. देवरे, व्ही. बी. नागरे, एन. जे. धांडे, एच. व्ही. वाघ, एल.एम. देशवतार , एस. व्ही. गोसावी , ए. वाय. बडगुजर , एन. बी. तडवी यांच्यासह आदी मंडळ अधिकारी व तलाठी या आंदोलनात सहभागी झाले आहे .