रावेर, प्रतिनिधी। तालुक्यातील मंगळुर येथे एका विस वर्षीय अविवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मंगळुर येथे आज दुपारी तीनच्या सुमारास अज्ञात कारणाने शुभम उमेश सपकाळे या विस् वर्षीय युवकाने आत्महत्या केली आहे. त्याचे वडील उमेश सपकाळे हे लोहारा आश्रम शाळा येथे कामठी म्हणून नोकरीस आहे तर आई मंगळुर येथील आश्रम शाळेत स्वंयपाकी म्हणून नोकरी असल्याने ते येथेच रहीवासी आहे. शुभम याने आत्महत्या का केली याबाबत अजुन कोणतेही कारण समजू स्पष्ट झालेले नाही.