जळगाव, प्रतिनिधी । दिल्ली येथे सुरु असलेल्या केंद्राच्या शेतकरी विरोधी आंदोलनास पाठींबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंदचा नारा देण्यात आला असून यानुसार जिल्हा बंद पुकारण्यात आले असून या आंदोलनात अन्न दाता शेतकऱ्याचे ऋण मान्य करून सामिल व्हावे असे आवाहन प्रतिभा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. याप्रसंगी करीम सालार, सुरेंद्र पाटील, सचिन धांडे, फारुक कादरी, भरत कर्डिले आदी उपस्थित होते.
मंगळवार ८ डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात येणार असून यासाठी ७० जन संघटना यांची मिळून जनआंदेालनांची संघर्ष समिती ( जळगाव ) स्थापन करण्यात आली आहे. मेादी सरकारचा शेतकरी विरेाधी पर्यायाने देशातील जनते विरोधी कट आहे. अन्न दाता शेतकऱ्यास गुलाम बनू द्यायचं नसेल तर ८ डिसेंबर रोजी तमाम मराठी व अमराठी महाराष्ट्राची जनता मेादी सरकार विरेाधात तसेच वीज कायदा २०२० देशांतील वीज उद्योगाचे खाजगीकरण करू पहात आहे. सर्व भारतीयांनी त्या विरूध्द उभे राहिले पाहीजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
महाराष्ट्र सरकार मधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना पूर्ण ताकतीने या बंदमध्ये सहभाग घेतील अशी कामगार शेतकरी जनतेची अपेक्षा आहे. भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष ८ डिसेंबर रोजी महाराष्ट्र बंद-भारत बंदमध्ये अन्न दाता शेतकऱ्याचे ऋण मान्य करून सामिल हेातील ही खात्री व्यक्त करून या बंद मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/386858362549078/