अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नाशिक येथे पत्रकार दिनानिमित्त बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाकडून येथील मंगळग्रह सेवा संस्थेला राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नाशिक येथील कलाकुंज मनियार टॉवर येथे सदर कार्यक्रम झाला.पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे, सुप्रसिद्ध अभिनेत्री स्मिता प्रभू, डॉ. सचिन दुगड, दिनकर पाटील, दिनेश शिरसागर, मेघा पाटील, शिरीष कुमार, अर्चना परदेशी, स्नेहराज इंद्रजीत, शोभा सातभाई, अमोल शिंदे, शबनम खान आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंगळ ग्रह सेवा संस्था सामाजिक जाणीवेचे उचीत भान ठेऊन करीत असलेल्या निःस्वार्थ सेवेची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त अनिल अहिरराव, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम, उपाध्यक्ष एस. एन. पाटील यांनी पुरस्कार स्वीकारला.