मंगरूळ येथील गुरुद्वारात सरबत वाटप

चांदवड, प्रतिनिधी । चांदवड टोलजवळ असलेल्या मंगरूळ येथील गुरुद्वारात गुरू अर्जुनदेव यांच्या शहीद दिनानिमित्त प्रसाद वाटप करण्यात आला.

गुरू अर्जुनदेव यांच्या शहीद दिनानिमित्त सरबत , चण्याची उसळ , प्रसाद वाटप करण्यात येत आहे. मंगरूळ येथील गुरुद्वार मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असल्याने अनेक भाविक प्रसादाचा लाभ घेत आहेत. यावेळी मनमाड येथील गुरुद्वारा साहिबचे मुख्य बाबा रणजितसिंग उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शीख बांधव मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक म्हणून काम करत होते. लहान मुलांची सेवा करण्यासाठी उपस्थिती लक्षणीय होती. या उपक्रमात सर्व जाती धर्मातील समाजबांधव सहभागी झाले होते.

Protected Content