जळगाव प्रतिनिधी । संपुर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन असल्यामुळे दारू विक्रीचे दुकाने बंद आहे. याचा पार्श्वभूमीवर गैरफायदा घेत तालुक्यातील भोलाणे शिवाराज गावठी दारू तयार करून चोरट्या मार्गाने वाहतूक करतांना तालुका पोलीसांनी तब्बल दोन लाख रूपयांची दारू जप्त केली असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यातील सर्व दारूची दुकाने बंद आहेत. याचा गैरफायदा घेत काही जण भोलाणे येथे तापी नदी पात्रात गावठी दारु तयार करुन त्याची परिसरात विक्री केली जात असल्याची माहिती जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे रविकांत सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सोनवणे यांनी सहकारी वासुदेव मराठे व इतरांना सोबत घेऊन बुधवारी पहाटे ५ वाजताच तापी नदीत जावून कारवाई केली. यावेळी पोलीस आल्याची चाहूल लागल्यानंतर मद्यनिर्मिती करणाऱ्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी एकूण ५ अड्डे उद्ध्वस्त केले. त्यात ७ हजार ६०० लिटर कच्चे, पक्के व काही उकळते रसायन होते. त्याची किंमत १ लाख ५२ हजार रुपये इतकी आहे. त्याशिवाय ३२ हजार २०० रुपये किमतीची तयार झालेली गावठी दारु,२० हजार रुपये किमतीची एक दुचाकी, ३५ लीटरच्या २३ टाक्या , ३८ पत्री टाक्या असा एकूण २ लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दारु व रसायन पेटत्या भट्टीत नष्ट करण्यात आल्या. अज्ञात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००