पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याच्या शेतामधुन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे.
भोजे – वरखेडी रोडवरील राजुरी खु” शिवारातील गावाजवळीक असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ क्विंटल कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे. घटने प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेतकरी देवराम शहादू माळी असे शेतकऱ्याचे नाव असून शेतकरी देवराम शहादू माळी यांना दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. यावर्षी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कबडे आधीच मोडले आहे. त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनीच चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे.
शेतकऱ्याची आधीच कापसाच्या उत्पन्नातही मोठ्याप्रमाणात घट झाली असुन कर्जाच्या खाईत लोटला जात आहेत. अशातच मोठ्या कष्टाने लावलेल्या कपाशीचे भुरट्या चोरांकडून मोठ्या प्रमाणात कापुस चोरून नेऊन तो खेडा खरेदी धारकांना विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत. भोजे येथील शेतकरी देवराम शहादू माळी यांनी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवितांना पिंपळगाव (हरेश्र्वर), शिंदाड, राजुरी, चिंचपुरे, वरखेडी या गावाच्या शिवा लागु असलेल्या त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनीच चोरल्याची शंका व्यक्त केली आहे.
तसेच परिसरात खेडा खरेदी सुरू असुन ज्यांचेकडे शेती नाही तेही कापूस विकतांना दिसत असुन त्यांचीही चौकशी करून खेडा खरेदी धारकांना याबाबत सुचना देण्यात याव्या की, यांच्या कडून कापूस घेण्यात येऊ नये तसेच या भुरट्या चोरांच्या चोरीला आळा घालण्यात यावे अशा प्रकारची अज्ञात चोरट्यांविरुद्व पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम ४६१ व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचा पुढील तपास पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गोरबंजार हे करीत आहे.