भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील बद्री प्लॉट मधील किराणा दुकानात विमल गुटख्याची करणाऱ्या तरूणाव कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुटखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी पोकॉ प्रशांत दिनेश परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील बद्री प्लॉट मधील पूजा प्रोव्हिजन या किराणा दुकानांमध्ये १९ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजेच्या दरम्यान आरोपी विनोद सुधाकर भारंबे वय ४७ राहणार बद्री प्लॉट हा स्वतःच्या फायद्यासाठी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या गुटखा व सुगंधी पान मसाला हा मानवाने खाल्यामुळे किंवा चघळल्यामुळे मानवी आरोग्यास व जीवितास धोका उपन्न होऊ शकतो, यांची विक्री करीत असतांना सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व सपोनि मंगेश गोंटला यांच्या आदेशावरून मिळून आल्याने आरोपीकडून २२ हजार ३१५ रुपयांचा विमल गुटखा ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला जमा करण्यात आला आहे. म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोना.रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पोकॉ.विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, प्रशांत सोनार, जीवन कापडे, कृष्णा देशमुख, योगेश माळी, परेश बिऱ्हाडे, गजानन वाघ अशांनी मिळून केली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि मंगेश गोंटला करीत आहे.