भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । : शहरातील अप्सरा टावर चौकात असलेल्या दुकानांसमोरील वाहने हटवून त्या ठिकाणी हातगाडी धारकांना जागा देण्यात आली आहे या प्रकारामुळे व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी तीन दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरातील अप्सरा चौकात असलेल्या शंभर फुटी रस्त्यावर हातगाडी धारकांनी अतिक्रमण केले आहे त्यामुळे इथून येजा करताना नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागतो ही बाब लक्षात घेता पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलाच्या दुकानांसमोरील वाहने हटवून हातगाडी धारकांना दुकानांच्या समोर ठेले लावण्यास आदेश दिले आहेत यामुळे आता दुकानांमध्ये ग्राहकांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे या प्रकारामुळे व्यापारी वर्ग संतापला असून त्यांनी तीन दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे पालिका प्रशासनाच्या या कारवाईनंतर व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी आपापली दुकाने बंद करून निदर्शने केली तसेच पालिका प्रशासनाच्या या कारवाईचा विरोध केला आहे.