भुसावळ विभागातील ५ कर्मचाऱ्यांचा सम्मान

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – मध्य रेल्वे विभागातील ५ रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी भुसावळ मंडळ मध्य रेल्वे प्रबंधक एस.एस. केडीया यांच्या हस्ते Man of the Month या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.

मध्य रेल्वे विभागाच्या भुसावळ मंडळातील लोको पायलट डी.डी.कोल्हे, मुख्य कार्यालय अधिक्षक दिलिप पाटील यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी प्रशस्ति पत्र व रोख देउन जानेवारी व फेब्रुवारीचे (Man of the Month) या पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
तर भुसावळ विभागांतर्गत बडनेरा येथील लाइनमन उमेद कांबळे, भुसावळचे टेक्निशियन राहुल पाटील, लोको पायलट हेमराज मीना याना प्रशस्ति पत्र व रोख रकम पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला. यावेळी अपर मंडल रेल प्रबंधक नविन पाटील व रुकमैया मीना, वरिष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे आदी अधिकारी उपस्थित होते

Protected Content