Home धर्म-समाज भुसावळ रोटरी रॉयल्स स्वातंत्र्यदिनी करणार ‘सन्मान कर्तबगारांचा…’

भुसावळ रोटरी रॉयल्स स्वातंत्र्यदिनी करणार ‘सन्मान कर्तबगारांचा…’

0
40

भुसावळ, प्रतिनिधी । येथील रोटरी क्लब ऑफ भुसावल रॉयल्स आणि उदिता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ शहरातील कर्तबगार व्यक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे.

रविवार १५ ऑगस्ट रोजी सायं. ५ वाजता भुसावळ येथील रोटरी भवन येथे रोटरी रॉयल्स क्लब आणि शहरातील उदिता कन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती तसेच दहावी व बारावीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी हे राहणार असून भुसावळ विभागाचे पोलीस उप अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचे हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. याप्रसंगी उपस्थितीचे आवाहन भुसावळ रोटरी रॉयल्सचे अध्यक्ष  रो. राजेंद्र यावलकर,  सचिव रो. विनोद तायडे, उदिता कन्स्ट्रक्शनचे संचालक भुपेंद्र शर्मा व प्रकल्प प्रमुख रो.गणेश फेगडे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound