भुसावळ- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | नागरिकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबाबत जागरूकता घडविण्यासाठी शहर पोलिसांच्या वतीने जनजागृती कार्यक्रम राबवून हेल्मेटचे महत्त्व देखील बॅनरच्या माध्यमातून पटवून सांगितले जात आहे.
राज्यभरात ज्युनिअर चार्ली फाँडेशन व सु:लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने वाहतूकीच्या नियमांबाबत मोहीम राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर भुसावळ शहर पोलिसांच्या वतीने सुरक्षितता पाळा अपघात टाळा असा संदेश देत जनजागृतीचा कार्यक्रम शहरातील विविध ठिकाणी जाऊन घेण्यात येत आहे. दरम्यान यावेळी
बॅनर, हेल्मेट विषयी जनजागृती देखील करण्यात आली. तत्पूर्वी ज्या वाहन धारकांनी हेल्मेट घातले होते. त्यांचा पुष्पगुच्छ देऊन पोलिसांच्या वतीने सन्मान करण्यात आले. व ज्यानी हेल्मेट घातले नव्हते. त्यांचे ज्युनिअर
चार्ली यांनी मुके घेतले. तसेच यावेळी वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम लावण्यात आले.
याप्रसंगी बोलताना वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले की,रस्ते वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. हेल्मेट घालूनच दुचाकी चालवायची व चारचाकी वाहने चालवताना सर्वप्रथम सिट बेल्ट लावायचा, ट्रॅक्टर चालकांनी वाहन नेताना ट्रॅक्टर मध्ये टेपरेकॉर्डर, साऊंड सिस्टीम ठेवू नये गाण्याच्या आवाजाने मागील वाहनांच्या व्हाॅर्नचा आवाज येत नाही. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना दक्षता घ्यावी. जर वाहनात टेपरेकॉर्डर आढळा तर गुन्हा दाखल करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात रस्ते अपघात बर्याच जनांचे जिव गेले आहे. त्यामुळे वाहतूक चालवताना काळजी घ्यावी. आपला जीव हा मौल्यवान आहे. आपल्या पाठीमागे कुंटूब आपली वाट पाहत आहे. आपण सुरक्षित तर आपले कुटुंब सुरक्षित असा भावनिक संदेश देखील त्यांनी यावेळी दिला.
सदर कार्यक्रम पोलिस अधिक्षक एम.राजकुमार,
अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व उपविभागीय पोलीस अधीकारी सोमनाथ वाघचौरे, यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला वरिष्ठ पोलीस निरिक्षक गजानन पडघन, विलास शेडे, सहायक पोलीस निरिक्षक स्वप्निल नाईक (वाहतूक शाखा), पोलीस कर्मचारी व समाजसेवक सुमित पंडित, समाजसेवीका पुजा पंडित व माणुसकी समुहाची टिमने मदतकार्य केले. ज्युनिअर चार्ली समाजसेवक सुमीत पंडित यांनी नागरिकांना रस्ते वाहतुकिची परिपुर्ण जानिव करुन दिली.
ज्युनिअर चार्ली च्या माध्यमातून जनजागृती
समाजसेवक सुमित पंडित यांनी ट्राफिक चे नियम आपल्या मुख अभिनयातून ज्युनिअर चार्लीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. ज्युनिअर चार्ली तथा समाजसेवक सुमित पंडित यांनी आपल्या हास्यकलेतून लोकांना ट्राफिकचे संपूर्ण नियम समजावून सांगण्यासाठी आपल्या मूक अभिनयातून जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.