Home Cities भुसावळ भुसावळ येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची बैठक उत्साहात

भुसावळ येथे राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची बैठक उत्साहात


bhusawal1 2

भुसावळ प्रतिनिधी । राजपूत समाजाची बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. यात श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेच्‍या महिला प्रदेशाध्यक्षा संध्या राजपूत, प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत, महेंद्रसिंग महाले, जळगाव जिल्हा अध्यक्ष महेंद्रसिंह राजपूत यांची उपस्थिती होती.

बैठकित तालुक्यातील युवा वर्गातील सदस्यांची निवड करण्यात आली. त्यात युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नकुल राजपूत, तालुकाध्यक्ष विक्की राजपूत, युवाअध्यक्ष गोपी राजपूत व भुसावळ शहराध्यक्षपदी गोकुळ राजपूत यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी समाजातील जेष्‍ठ संजयसिंह चव्‍हाण, समाधान महाजन, प्रशांत ठाकूर, गणेश राजपूत, दलजीतसिंह चौधरी, गणेश राजपूत, अभिजित पाटील, दीपक मावळे, गोपी राजपूत, सोनी ठाकूर, यशवंत चौधरी, हर्षल पाटील व असंख्य समाज बांधव उपस्थित होते. प्रसंगी भविष्यात समाजाच्या उज्‍वल भविष्यासाठी सरसकट जातीचे दाखले देण्यासाठी मोठा मेळावा घेण्याचे संध्या राजपूत यांनी आपल्या मार्तगदर्शन करतांना सांगितले.आभार प्रदर्शन दीपक मावळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रदेश युवा उपाध्यक्ष दामोदर राजपूत यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound