भुसावळ प्रतिनिधी । केंद्र सरकारने अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेल व गॅसची दरवाढ केल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मासलवाहतुक व्यवस्थेला फटका बसणार आहे. व्हॅट व उत्पादन शुल्कावाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल व डिझेलवर कृषी अधिभार लावण्याचा प्रस्ताव आहे. घरगुती गॅस अबकारी करात सातत्याने वाढ होत आहे.यामुळे जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल डिझेलची दरवाढ होणार नाही, असा शब्द केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलवर कृषी उपकर लावल्यानंतर दिला होता. पण शब्दाचा बुडबुडाच ठरला आहे. आतंरराष्ट्रीय बाजाराकडे बोट दाखवून स्वतःचा बचाव करीत आहे.सत्ताधारांची ही जुमलेबाजी देशाला नवीन नाही. तीन कृषी कायदयांच्या नावाने शेतकऱ्यांची अशीच जुमलेबाजी सुरू आहे.
केंद्र सरकारने केलेली पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस दरवाढ सामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करीत आहे. दरवाढीमुळे मालवाहतुकीचा खर्च वाढणार असून महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीविरोधात देशात आंदोलन केली जात आहे. मात्र पेट्रोलियम कंपन्यांच्या सपाटा कायम आहे. यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व मासलवाहतुक व्यवस्थेला फटका बसणार आहे. व्हॅट व उत्पादन शुल्कावाढीने डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्यामुळे महागाई वाढली आहे. इंधन वाढीचा भुसावळ शिवसेनातर्फे निषेध करण्यात आला आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/805943346627491