भुसावळ येथील आरोग्‍य केंद्रात आशा दिन साजरा

Bhusawa2

भुसावळ प्रतिनिधी । जिल्‍हा परिषद व पंचायत समिती आरोग्‍य विभागातर्फे येथील महात्‍मा फुले नगर, आरोग्‍य केंद्रात आशा दिन मोठ्‍या उत्‍साहात साजरा करण्‍यात आला. कार्यक्रमाची सुरूवात धन्‍वंतरी पुजन, दिपप्रज्‍वलन व स्‍वागत गिताने झाली.

अध्‍यक्षस्‍थानी आ.संजय सावकारे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन पं.स.सभापती मनिषा पाटील, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, गटविकास अधिकारी विलास भाटकर,आरोग्‍य समिती सभापती सोनल महाजन, माजी नगराध्‍यक्ष युवराज लोणारी आदी उपस्‍थित होते. यावेळी संस्‍थेतील प्रसुती, क.शस्‍त्रक्रिया, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृत्‍व योजना आदी आरोग्‍य योजनात उत्‍कृष्‍ट कार्य करणाऱ्‍या आशा सेविकांना प्रशस्‍तीपत्र व गुलाबपुष्‍प देऊन तर ज्‍या आशांच्‍या भागात माता व बालमृत्‍यू नाही अशा भागातील आशा व गटप्रवर्तक यांना मान्‍यवरांच्‍या हस्‍ते विशेष सन्‍मानित करण्‍यात आले. आ.संजय सावकारे मार्गदर्शन करून त्‍यांच्‍या निवडीचे प्रश्‍न सोडविण्‍याचे आश्‍वासन दिले. सभापती मनिषा पाटील यांनी आशांच्‍या कार्याचे कौतुक केले.प्रस्‍ताविक तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. संगिता दवांगे-पांढरे यांनी तर सुत्रसंचलन दिपककुमार दिक्षीत यांनी केले. याप्रसंगी सर्व प्राथमिक आरोग्‍य केंद्र व नागरी आरोग्‍य केंद्रातील वैद्‍यकिय अधिकारी व आरोग्‍य कर्मचारी उपस्‍थित होते.

Protected Content