भुसावळ बाजारपेठच्या सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे निधन

भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदाराचे कोरोनामुळे आज बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जळगावच्या खाजगी रुग्णालयात निधन झाले.

गेल्या 15 दिवसांपूर्वी एजाज खान अहमदखान पठाण (58) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर त्यांना जळगावच्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. याबाबचे वृत्त भुसावळातील पोलिस दलात धडकताच कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक् केली. कायदेशीर सोपस्कार पार पडल्यानंतर दुपारी दोन वाजता मुस्लीम कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. पठाण यांच्या पश्चात पत्न, मुलगा, दोन मुली, जावई, सून व नातवंडे असा परीवार आहे. गेल्या 35 वर्षांपासून पोलिस दलात प्रामाणिकपणे कार्य करणार्‍या पठाण यांचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूनंतर पोलिस कर्मचार्‍यांनी हळहळ व्यक्त केली.

दोन कर्मचार्‍यांचा कोरोनाने घेतला बळी
बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हजेरी मास्तर आनंदा गजरे यांचे 27 मे रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर काही कर्मचार्‍यांचे अहवाल पॉझीटीव्ह आले होते. या घटनेला ७ महिने उलटत नाही तोच एएसआय एजाज पठाण यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

Protected Content