भुसावळ प्रतिनिधी । मालेगाव येथे ड्युटीवर असणार्या येथील बाजारपेठ पोलीस कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे.
मालेगाव येथे कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यातच या परिसरात ड्युटीला असणार्या काही पोलीस कर्मचार्यांनाही कोरोनाने ग्रासल्याचे दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वीच तेथे बंदोबस्तासाठी असणार्या जिल्ह्यातील दोन पोलिसांना या विषाणूने ग्रासल्याचे आढळून आले होते. या पाठोपाठ आता बाजारपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असणार्या व सध्या मालेगाव येथे बंदोबस्तास असणार्या पोलीस कर्मचार्याला कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणीतून दिसून आले आहे. या कर्मचार्याला नाशिक येतील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००