भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक गजानन राठोड यांची बदली झाल्यानंतर रिक्त पदावर सोमनाथ वाघचौरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे आदेश गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी काढले आहे.
सोमनाथ वाघचौरे यापुर्वी शिर्डी पोलीस विभागाच्या पोलिस उपअधिक्षकपदी कार्यरत होते. गेल्या आठवड्यात पोलीस सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यात वाघचौरे यांची देखील बदली करण्यात आली होती. मात्र बदलीचे ठिकाण निश्चित झालेले नव्हते. आता त्यांची भुसावळ विभागाच्या पोलीस उपअधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलीय.
भुसावळ शहरात क्षुल्लक कारणांवरून हाणामारी, खून, वाढत्या चोऱ्यांच्या प्रमाणात अधिक वाढ झाली आहे. नूतन पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यापुढे आता गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान असणार आहे. येत्या दोन दिवसात ते आपला पदभार स्विकारणार आहेत.