भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वराडसीम परिसरात सुरू असणार्या हातभट्टीच्या अड्डयांवर पोलिसांनी धाड टाकून तयार दारू व रसायन जप्त करत संशयितांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तर एकाला दारू विक्री करतांना अटक केली आहे.
वराडसीम येथे संशयित भरत उर्फ पिंटू देवीदास ठाकूर याची हातभट्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकून भट्टी उद्ध्वस्त केली. याप्रसंगी ९०० लिटर कच्चे रसायन नष्ट करत ३२ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. यासोबत वराडसीम येथील सुनील बाबुराव कोळी याच्या भट्टीवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी तेथून ५० लिटर दारू जप्त करत १३०० लिटर कच्चे रसायन नष्ट केले. दोन्ही संशयित पसार झाले आहेत.
यासोबत पोलिसांना फेकरी गावाजवळील झेडटीसी परिसरात संशयित आकाश रमेश परदेशी (रा. कवाडेनगर, भुसावळ) हा गावठी दारूची विक्री करताना आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई उप विभागीय पो अधिकारी गजानन राठोड यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस निरी रामकृष्ण कुंभार, सपोनी अमोल पवार, सफौ/ सुनिल चौधरी पोहेकॉ युनूस शेख, पो हे कॉ विठ्ठल फुसे, पोना/ राजेंद्र पवार,प्रदीप इंगळे राहुल महाजन हो. गार्ड रितेश सेकोकारे यांनी केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००