भुसावळ प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन असल्याने रेशन मिळण्यासाठी नागरीकांची मोठ्या प्रमाणावर रेशनदुकानांवर गर्दी जमली आहे. त्यामुळे दुकानदारांना विनाकारण दमदाटी होत असल्याने पोलीस संरक्षण आणि ५० लाख रूपयांचा विमा संरक्षण मिळावे अशी मागणी रेशन दुकानधारकांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत महिती अशी की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर शासनाने नागरिकांना धान्याचे वाटप करण्यासाठी रेशन दुकानदारांकडे धान्याचा पुरवठा करण्यासाठी यंत्रणा उभी केलेली आहे. सर्वच गरजू व्यक्तींना रेशन दुकानदारांमार्फत रेशनचा पुरवठा केला जातोय, असे असताना काही रेशन दुकानांवर खूप गर्दी होत असून काही लोक दुकानदारांना विनाकारण दमदाटी करत असून यामुळे रेशन दुकानदार हैराण झालेले असून आम्हाला पोलिस संरक्षण व ५० लाखांचा विमा संरक्षण मिळावे, अशी मागणी रेशन दुकानदारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.