भुसावळ काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 

भुसावळ : प्रतिनिधी । अमृत योजनेची पाईप लाईन टाकताना ठेकेदाराकडुन रोडची दुरुस्ती पूर्वीप्रमाणे करुन घेण्याची मागणी करणारे निवेदन भुसावळ शहर काँग्रेसने न प मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे

 

भुसावल शहर कॉग्रेस अल्पसंख्यॉक विभागाकडून देण्यात आलेल्या या निवेदनात पुढे म्हटले आहे की भुसावल शहरात अमृत योजनेचे पाईप टाकतांना नगरपालिकातर्फे ठेकेदाराना अशा अटी व शर्ती होत्या की  पाईप टाकतांना रोड खोदतांना खराब होईल ते रोड ठेकेदारांनी दुरूस्ती करून देणे बंधनकारक  असेल परंतु ठेकेदारांनी संपुर्ण शहरामध्ये रस्ते  खोदुन खराब केले आहे  त्यामुळे अनेक  लहान मोठे अपघात झाले लोकांना  पायी चालणे जिकिरीचे झाले आहे  जोपर्यत ठेकेदार रोड दुरुस्त करत नाही तोपर्यत त्यांचे पुर्ण बील देऊ  नये अन्यथा संपूर्ण जवाबदारी नगरपालिकेवर असेल

 

या निवेदनाच्या प्रति जिल्हधिकारी  व उपविभागीय अधिकारी  यांनाही देण्यात आल्या आहेत

 

Protected Content