भुसावळ संतोष शेलोडे । शहरातून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असणार्या कपाटाच्या गोदामात तब्बल २.३५ लाख रूपयांचा दारू साठा जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत वृत्त असे की, महामार्गाला लागून असणार्या कपाट बनविण्याच्या गोडाऊन मध्ये संचारबंदीत मध्ये जादा दराने देशी- विदेशी दारूची विक्री करीत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी गजानन राठोड यांना मिळाली होती. यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी व सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे यांनी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बाजारपेठचे पो.ना इरफान काझी, दीपक पाटील, रमण सुरळकर, युवराज नागरुत, माणिक सपकाळे, प्रशांत परदेशी व आयज शेख तसेच राज्य उत्पादन शुल्क अधिकारी कल्याण मुळे व कॉन्स्टेबल नंदू पवार यांनी मिळून येथे छापा मारून दारू साठा जप्त केला. या संदर्भात रमण सुरळकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.
खाली पहा या कारवाईचा व्हिडीओ.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/648620659253464
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००