भुसावळ प्रतिनिधी । शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डाच्या परिसरात शम्मी चावरिया हा हद्दपार असणारा गुन्हेगार आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, दिनांक २६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास भुसावळ शहरात विठ्ठल मंदिर वॉर्ड मध्ये विठ्ठल मंदिराच्या मागिल बाजुस दोन वर्षांसाठी हद्दपार असलेला आरोपी शम्मी प्रल्हाद चावरीया (वय – ३२ रा. जामनेर रोड वाल्मीक नगर ७२ खोली, भुसावळ) हा शहरात बेकायदेशीर रित्या प्रवेश करत असल्याची गुप्त माहीती पोलीस पथकाला मिळाली.
या अनुषंगाने पो.नि. अनिल मोरे, पो.कॉ उमाकांत पाटील ,तुषार पाटील , कृष्णा देशमुख , प्रशांत परदेशी यांच्या पथकाने लागलीच त्याला ताब्यात घेतली. संबंधीत आरोपीला हदपार केले असतांना सुध्दा तो महाराष्ट्र शासन तसेच अधिक्षक जळगाव यांचे आदेशाचे उल्लंघन करुन भुसावळ शहरात मिळुन आला म्हणुन त्यावर भु.बा.पेठ पो.स्टे ला भाग ६ गु.र.न ३२ /२०२० ( महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे ) गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ शंकर पाटील करीत आहेत.
संबंधीत आरोपी शम्मी प्रल्हाद चावरीया हा भु.बा.पेठ पो.स्टे चा हिस्ट्रिशिटर व रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे त्यावर बाजारपेठ पोलीस स्थानकात कलम ३९९ ( दरोड्याचा प्रयत्न ); ३९५ ( दरोडा ); ३९२ ( जबरी चोरी ); ३/२५ , ४/२५ ( आर्म अँक्ट ); ३५४ ( विनय भंग ); १४२ ( हदपार ) या सारखे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याला ताब्यात घेण्याची कारवाई पो. अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पो. अधीक्षक भाग्यश्री नवटके, उप.पो.अधिकारी गजाजन राठोड व पो. निरी दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.